राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी चालणाऱ्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धचे उदघाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सलगर वस्ती पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये लाखोंचे रोख पारितोषक व चषक,आकर्षक बक्षीस ठेवलेले आहे. रोख पारितोषक अनुक्रमे 51 हजार,31 हजार,11 हजार ठेवण्यात आले आहे. ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये सहा संघ मालकांना 72 खेळाडू देण्यात आले. स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा,रामवाडी,मैदान सोलापूर मॅटवर खेळवली जात आहे.
पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स, काकाश्री युथ फाऊंडेशन, श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब यांनी विजय मिळवला
यावेळी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदन गायकवाड,युवा नेते अनिल जाधव, सुदर्शन हसापुरे, पंचप्रमुख संतोष गायकवाड, आझम सैफन, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे,धीरज खंदारे, मनोहर चकोलेकर, चेतन अलकुंटे, नितीन जाधव, शंकर जाधव, ईलाई हलगूर, धर्मा रुपनर, नागेश जाधव संतोष गायकवाड, रोहन जाधव,ओम सोमवंशी,नियोजन समिती चंद्रकांत नाईक, शिवशरण नुला,गोपाल दोडमनी,सागर भिसे, अजय जाधव,दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते.