ना. चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा ; राज्यातील बारा हजार डिजिटल पत्रकारांसाठी….
सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील तब्बल 12000 डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी एक मोठी घोषणा केली. या सर्व डिजिटल पत्रकारांसाठी विमा योजना तयार करण्यात आली असून प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही योजना अंमलात आणण्यात येणार आहे. विमा योजनेचा हप्ता सुद्धा प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ही योजना काय आहे ऐका त्यांच्याकडून…
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने पत्रकारांच्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्याच्या JW Marriott या पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, विधिमंडळ पत्रकार संघटनेचे दिलीप सपाटे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत महा गौरव पुरस्काराचे वितरण ही मोठ्या थाटात झाले.



