
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्याची पाहणी ; काम अंतिम टप्प्यात
पुणे- सोलापूर शहरातील न्यु. बुधवार पेठ परिसरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारी त्यागमूर्ती माता रमाई यांचा पूर्णकृती पुतळा उभारणे बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या प्रस्तावानुसार सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
त्यानुसार त्यागमूर्ती माता रमाई याचा पुतळा तयार करण्याची वर्क ऑर्डर पुणे येथील मूर्तिकार सुभाष अल्हाट यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले होते. सदरच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सोलापुरातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक दत्ता गायकवाड यांनी पाहणी केली.
यापूर्वी त्यांनी सदरच्या पुतळ्यामधील त्रुटी व उणीवा मूर्तिकार सुभाष आल्हाट यांना लेखी स्वरुपात दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पुतळ्यामधील त्रुटी, सुचवलेल्या दुरुस्त्या करून क्ले मॉडेल तयार केले.
याप्रसंगी मूर्तिकार सुभाष आल्हाट व त्यांचे सहकारी यांचा ज्येष्ठ अभ्यासक दत्ता गायकवाड यांच्या हस्ते शाल व निळी टोपी, पुष्पगुच्छ व चैतन्याचे प्रणेते- डॉ बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आनंद चंदनशिवे, कमलाकर बनसोडे, सुधीर चंदनशिवे, चंद्रकांत सोनवणे, अक्षय मस्के, भीमा मस्के, इत्यादी उपस्थित होते.