पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मखमली टोपी आणि शाल पांघरून पालकमंत्र्यांचा सत्कार करून इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी आमदार दिलीप माने आदींची उपस्थिती होती.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच युवकांना रोजगार निर्मिती आणि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी नूतन पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरचा विचार करावा आणि भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे केली.
या मागणीला उत्तर देताना पालकमंत्री गोरे यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता सोलापूरसाठी नव रोजगार निर्मिती आणि सोलापूरच्या विकासासह नवनव्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊ असा शब्द त्यांनी किसन जाधव यांना दिला. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट आमदार देवेंद्र कोठे यांनी घडवून आणल्या निमित्त यावेळी किसन जाधव यांनी आमदार कोठे यांचे आभार मानले.
यावेळी सचिन अंगडीकर, अजय गायकवाड (व्हटकर), माणिक कांबळे, वसंत कांबळे, महादेव राठोड यांच्यासह यांच्या भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती.