सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. तो विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्वांसाठी दरवर्षी आमदार सुभाष देशमुख हे स्नेहभोजनाचे आयोजन करतात.
यंदाही शेळगी भागातील लोकमंगल मल्टीस्टेट कार्यालयाच्या आवारात स्नेहभोजनाच्या आयोजन झाले. अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली.
आमदार सुभाष देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, रोहन देशमुख या सर्वांनी उपस्थित आमचे स्वागत केले.
काँग्रेस नेते अशोक निम्बर्गी, विक्रम देशमुख, भाजप ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, राष्ट्रवादीचे नेते पद्माकर काळे, मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
मनीष देशमुख यांनी यावेळी आपल्या मित्रांसाठी स्वतः ‘चलते चलते’ हे किशोर कुमार यांचे गीत गायले. या गीताला उपस्थित आणि भरभरून दाद दिली, त्यामुळे या स्नेहभोजनाची लज्जत आणखीच वाढल्याचे पाहायला मिळाले.