“कुलकर्णी साहेब तुम्ही नाही, सोलापूर झेडपी का अभी ‘मैं हू डॉन”
सोलापूर : अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटातील ‘मैं हू डॉन” हे गीत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येकाना तोंड पाठ आहे. त्याला कारणही तसेच आहे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी त्यांनी स्वतः ‘मैं हू डॉन” हे गीत अनेक वेळा गायले असल्याने ते पॉप्युलर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक महोत्सव मध्ये हे गीत खूपच गाजले, त्यावर सर्वच विभाग प्रमुखांनी ठेका धरला होता.
आता जिल्हा परिषदेमध्ये संतोष कुलकर्णी नाही तर दुसराच कार्यकारी अभियंता डॉन म्हणून पुढे आला आहे. त्यांचे नाव आहे सुनील कटकधोंड. सध्या कटकधोंड यांचीच झेडपी मध्ये हवा आहे. उपा अभियंता असलेले सुनील कटकधोंड यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सर्वात मोठ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार आहे
आता पुन्हा त्यांच्याकडे समग्र शिक्षा अभियानच्या कार्यकारी अभियंता पदाचा पदभार मिळाला आहे.
समग्र शिक्षा अभियानचा पदभार कनिष्ठ अभियंता पताळे यांच्याकडे होता, पताळे यांच्या कामाबाबत आलेल्या तक्रारी आणि त्यांनी पदावरून मुक्त करण्याचा सीईओ मनिषा आव्हाळे यांच्याकडे 26 फेब्रुवारी रोजी केलेला अर्ज तेव्हा दोन कार्यकारी अभियंते असतानाही सीईओ यांनी हा सुद्धा पदभार कटकधोंड यांच्याकडे दिला आहे.
यापूर्वी जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी लागली होती त्यामध्ये कटकधोंड यांचेही नाव होते, त्यामुळे आव्हाळे यांनी तडकाफडकी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार काढला. तेव्हा अनेकांनी आव्हाळे यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या ठाम राहिल्या. शेवटी जल जीवन मिशनच्या कारभार पाहण्यासाठी तसा योग्य अधिकारी मिळाला नाही, चौकशी झाली शेवटी कटकधोंड यांनाच प्रशासनाला पदभार द्यावा लागल्याचे पाहायला मिळाले.