रमेश कदम यांना चर्चेत आणण्यात गाझी जहागीरदार मास्टरमाईंड? ; “भाई हमको भी विश्वास मे लो ना”
सोलापूर : एम आय एम पक्षातील युवा चेहरा, पक्षातील चॉकलेट हिरो, शहर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांचा अतिशय आवडता सहकारी म्हणजेच माजी नगरसेवक गाझी जहागीरदार. यांना पक्षातील मास्टर माईंड म्हणून ही ओळखले जाते.
हेच गाझी जहागीरदार आहेत ज्यांनी स्वतःच्या ताकदीवर फारुख शाब्दी यांना एम आय एम पक्षात अध्यक्ष केले. सदैव त्यांच्या पाठीशी खंबीर राहिले आहेत. प्रत्येक ठिकाणी ताकद दिली. त्याचा प्रत्यय 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला.
आता एम आय एम हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी अद्यापही अधिकृत घोषणा केली नाही. वरिष्ठांच्या आदेशाची ते वाट पाहत आहेत.
दरम्यान एम आय एम च्या पदाधिकाऱ्यांनी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापुरात भेट घेतली. या भेटीची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. त्या भेटीमध्ये गाझी जहागीरदार हेच लिडमध्ये दिसून आले. नसीम खलिफा, अझहर हुंडेकरी वगळता काही युवा कार्यकर्ते होते. या भेटीनंतर पक्षातील काही ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते प्रचंड नाराज झाल्याचे ऐकण्यास मिळाले.
फारुख शाब्दी यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक हा विषय तितका सोपा आहे का? कुणीही जायचे आणि काहीही करायचे, हम आपको आमदार करने की सोच रहे है और आप, क्या भाई, देश में का वातावरण तो देखो, इस से ऐसा लगता है की आप हमे विश्वास मे नही ले रहे…! अशा काही शब्दांमध्ये शाब्दी यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे.