काडादी ग्रामीण भागात तर महादेव कोगनुरे शहरी भागात नागरिकांच्या भेटीला ; लिंगायत नेत्यांमध्ये रस्सीखेच
सोलापूर : एम के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी सोलापूर शहर स्वागत नगर, कुमठा नाका भागातील विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट देऊन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती की महादेव कोगनुरे यांनी विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट द्यावी. म्हणून महादेव कोगनुरे यांनी कुमठा नाका परिसरात येथे जाऊन या भागातील वाढलेल्या समस्यांचा आढावा घेतला.
विशेष करून महादेव कोगनुरे यांनी गेली अनेक वर्षे शांती नगर भागातच वास्तव्यास होते. सहजिकच महादेव कोगनुरे यांना मानणारा मोठा वर्ग या भागात राहतात. या भागातील नागरिकांशी महादेव कोगनुरे यांची नाळ आज ही घट्ट असल्याचे बोलले जात आहे. महादेव कोगनुरे यांच्या भेटीत या भागातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी आदी सोयीसुविधेपासून वंचित असल्याचे पहायला मिळाले. यावेळी महादेव कोगनुरे यांनी या भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी गीता कनकी, अश्विनी येमूल, रामहरी माने, विजय कामोजी, विठ्ठल झिपरे आदी प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.