डोळ्यावर विश्वास बसेना पण पण भाजपसाठी पॉझिटिव्ह ; भाजप कार्यकर्त्यांची चर्चा ; दोन्ही देशमुख आमदारांनी……
सोलापूर : नव्याने सुरू होत असलेल्या सोलापूर विमानतळाची पाहणी पार्टीचे आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित मिळून केली. विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या विमानतळाचे उद्घाटन होणार होते मात्र मोदी यांचा पुणे दौरा वातावरणाच्या बिघाडामुळे रद्द झाला.
त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन देशमुख आमदारांसह शहराध्यक्ष नरेंद्र काळे, रोहिणी तडवळकर पांडुरंग दिंडी संजय कोळी विशाल गायकवाड रामप्पा चिवडशेट्टी यांनी एकत्रित या नूतनीकरण झालेल्या विमानतळाची पाहणी केली.
लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अनेक जण भाजपमध्ये इच्छुक झाले आहेत. त्यामुळे या दोनही देशमुख आमदारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. या एकूणच वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे दोघेही एकत्र येणे पक्षासाठी अतिशय गरजेचे असल्याचे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.