Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात बजरंग दल व विहिंपची निदर्शने ; क्रूरकर्मा औरंगजेबची…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 March 2025
in Social
0
सोलापुरात बजरंग दल व विहिंपची निदर्शने ; क्रूरकर्मा औरंगजेबची…..
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात बजरंग दल व विहिंपची निदर्शने ; क्रूरकर्मा औरंगजेबची…..

सोलापूर : भारताच्या छताडावरील अत्याचारी, दुराचारी आणि व्याभिचारी क्रूरकर्मा औरंग्याची कबर उखडून टाका, अन्यथा आम्ही कारसेवा करून उखडून टाकणार, अशी घोषणा विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने केली. यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सोलापुरात विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कूरकर्मा औरंगजेबची कबर हटवण्याचा निर्धार शिवजयंतीच्या शुभदिनी करण्यात येत असल्याचे विहिंपने जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबच्या कबरीला सरकारकडून विशेष पोलिस संरक्षण दिले आहे. राज्य सरकार पुरातत्व खात्याच्या आड या कबरीचे संरक्षण करीत असून शिवाय त्यावर लाखो रुपये खर्ची पडत आहेत. हिंदू बांधवांच्या कररूपी पैशातून हा खर्च कदापि मान्य नाही. सरकारने विनाविलंब औरंग्याची कबर काढून टाकावी, यासाठी आज संपूर्ण राज्यभरात विहिंप बजरंग दलाच्यावतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच विधानसभेत राज्य सरकारने ठराव करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कबर हटवावी. औरंगजेब क्रूरकर्मा होता. त्याने सत्तेसाठी भाउ, वडील यांचीही हत्या केली. धर्मवीर संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले. शिवाय हिंदुस्दथानातील अनेक मंदिरांची नासधूस केली. महिलांवर अत्याचार केले. त्याची कबर येथे ठेवणे आणि त्याचे संरक्षण निषेधार्ह आहे. त्यामुळे सरकारने कबर हटवणे हाच एकमात्र उपाय आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती आहे या पार्श्‍वभूमीवर विहिंप बजरंग दलाने प्रतिज्ञा केली आहे. विहिंप जेे संकल्प करते, तेे पूर्णत्वास नेतो, 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या बाबरी ढाँचा हे उदाहरण आहे. त्यामुळे सरकारने याबाबत कार्यवाही केली नाही तर तिथे कारसेवा करण्याचा निश्‍चय आज करत आहोत, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले. तसेच जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांचीही भाषणे झाली. तसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देउन सरकारचे लक्ष वेधले. या आंदोलनात विहिंपचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोेेेलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाप्रसंगी जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, बजरंग दल सहसंयोजक नागेश बंडी, सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी, गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, जिल्हा सहमंत्री बाबूजी गिरगल, विष्णू जगताप, पुरुषोत्तम उडता, जयदेव सुरवसे, अंबादास अक्कल, संजीव चिप्पा, बसवराज सोलापुरे, अक्षय कनकुंटला, अमितकुमार गडगी, शिवकुमार पसनूर, गोपाल म्हंता, आकाश सूर्यवंशी, दुर्गा वाहिनी संयोजक नंदीनी अक्कल, आदित्य चिप्पा, प्रज्वल बासुतकर, राजेंद्र सैनी आदी विहिंप व बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: #Aurangjebछावाबजरंग दलविश्व हिंदू परिषद
SendShareTweetSend
Previous Post

पी.बी. ग्रुपच्या भीम जयंती उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे

Next Post

सोलापुरात शिक्षक समितीचा एल्गार ; या शासन निर्णयाला कडाडून विरोध

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
पी.बी. ग्रुपच्या भीम जयंती उत्सव अध्यक्षपदी बाबा गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रथमेश सुरवसे

सोलापुरात शिक्षक समितीचा एल्गार ; या शासन निर्णयाला कडाडून विरोध

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995675
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group