‘महाराष्ट्राची आदिशक्ती’ मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन ; दुर्गादेवीच्या विविध रूपांचे होणार दर्शन
सोलापूर – नवरात्र उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या ‘महाराष्ट्राची आदिशक्ती’ या मंडळाच्या सजावट व देखाव्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने व माजी महापौर महेश कोठे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस दरम्यान तरटी नाका पोलीस चौकी येथे असलेल्या ‘महाराष्ट्राची आदिशक्ती’ नवरात्र महोत्सव मंडळांने यंदाच्या नवरात्र उत्सवात राजमहल साकारला आहे. यामध्ये केलेल्या सजावटीमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांचे भाविकांना दर्शन होणार आहे. उत्सव कोणताही असला तरी सामाजिक उपक्रम व सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून गेली 40 वर्ष हे मंडळ आपली परंपरा टिकवून आहे.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सजावटीचे उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सी. ए. सुशील बंदपट्टे, श्रीनिवास यमपुरे, अध्यक्ष अतीश अलकुंटे, उपाध्यक्ष किरण मुदगल व मंडळाचे पदाधिकारी तसेच शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान राजाभाऊ कलकेरी, दीपक जाधव, महेश अलकुंटे, अशोक यमपुरे, संतोष इरकल दत्तू अलकुंटे भीमाशंकर बंदपट्टे, शाम मुद्दे, यशपाल शिंगाडे , युवराज बंदपट्टे, सचिन इरकल व मनोज विटकर आदींचे मंडळाच्या विविध कामात मार्गदर्शन लाभले.
यावेळी वडार समाजातील गोपाळ पाथरूट, ज्ञानेश्वर इरकल चंद्रशेखर भांडेकर पुनाजी भांडेकर अंकुश बंद पट्टे देविदास देवकर लखन इटकर आदी उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. तसेच समाजातील कर्तबगार महिलांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात येते. या कर्तबगार महिलांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतो.