सोलापुरात नितीन गडकरींच्या दोन सभेने भाजपच्या प्रचाराची सांगता
महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ५ मे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दोन सभा होणार आहेत. दुपारी १२ वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे सभा होणार आहे.
या सभेला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक मळसिध्द मुगळे यांनी दिली आहे.
त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सभास्थळी २० ते २५ हजारांवर लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती मुगळे यांनी दिली आहे.
यानंतर गडकरी यांची अक्कलकोट तालुक्यात सभा होणार असल्याची माहिती आहे.