Saturday, August 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अजितदादांनी सोलापूरची जबाबदारी दिली मामा अन् अण्णांवर ; तब्बल ४२७ इच्छुकांच्या झाल्या मुलाखती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 December 2025
in political
0
अजितदादांनी सोलापूरची जबाबदारी दिली मामा अन् अण्णांवर  ; तब्बल ४२७ इच्छुकांच्या झाल्या मुलाखती
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अजितदादांनी सोलापूरची जबाबदारी दिली मामा अन् अण्णांवर ; तब्बल ४२७ इच्छुकांच्या झाल्या मुलाखती

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मामा आणि अण्णा हे दोघेही नेते सर्व समावेशक असल्याने सोलापुरात राष्ट्रवादीला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर
पक्षामध्ये ४६५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते.

मंगळवारी यातील ४२७ जणांनी राष्ट्रवादी भवनात दिवसभरात मुलाखती दिल्या. ज्यामध्ये प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, अभियंता, उद्योजक, उच्च विद्याविभूषित युवक युवतींचा मोठा समावेश होता. माजी महापौर आणि माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी भवनात मुलाखतीसाठी लावलेली हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

सोलापूर शहरात मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाकडे उच्चशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेत जाण्यासाठी सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर आसुसलेला असल्याचे दिसून आले .

जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सकाळी १० वाजता मुलाखतीला सुरुवात झाली. दुपारनंतर मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांचा मोठी मांदियाळी होती. सायंकाळी आठ वाजता ४६५ इच्छुकांपैकी ४२७ जणांनी मुलाखती दिल्या.

प्रभागाची सामाजिक समीकरणे, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, प्रवर्गानुसार कास्ट सर्टिफिकेट, निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे आदी प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आले. सोलापूरच्या विकासासाठी झपाटलेल्या उच्चविद्याविभूषित युवक युवतींनी मात्र जोशपूर्ण आणि दमदार मुलाखती दिल्या. सोलापूर शहराची बकाल अवस्था पाहता रस्ते, वीज आणि पाणी या सार्वजनिक मूलभूत सुविधा कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे अनेकांनी सांगितले.अनेक युवक युवतींची सोलापूरच्या विकासासाठी आत्मीयता आणि तळमळ दिसून येत होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विकासाचे व्हिजन आणि अहोरात्र झटण्याचे त्यांचे कार्य पाहून आपणास सोलापूरच्या विकासासाठी नगरसेवक होण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली. दिवसभर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पक्षाच्या कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी भवन इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने फुलून गेले होते. आपण जरी पुण्यात कामानिमित्ताने असलो तरी सोलापूर शहराविषयी आपणास आस्था असून विकास कामात झोकून देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. सोलापूर शहरातील विडी घरकुल परिसराच्या विकासासाठी तृतीयपंथीय इच्छुक उमेदवारांनी दिलेली राष्ट्रवादी भवनातील मुलाखत सर्वाच्या चर्चेचा विषय होती.

इच्छुक उमेदवारांशी
यांनी साधला संवाद !
राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, मागासवर्गीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत कांबळे, अल्पसंख्यांक नेते वसीम बुऱ्हाण,ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत चौधरी, महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, ज्येष्ठ नेते आप्पाशा म्हेत्रे.

अजित दादांच्या विकासाचे व्हिजन सोलापूरकर इच्छुक उमेदवारांनी मनावर घेतले !
————————————
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्रातील विकास कामांची धडपड आणि व्हिजन सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजितदादांचे विकास कामाचे व्हिजन सोलापूरकर इच्छुकांनी मनावर घेतल्याचे मंगळवारच्या मुलाखतीवरून दिसून आले आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळपास असेल यात तिळमात्र शंका नाही. इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानंतर व सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे व सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करणार आहोत.
संतोष पवार, शहर – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Tags: Ajit Pawar NCPAnna bansodeDattatray bharane
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात देशमुख- कल्याणशेट्टी यांचे मनोमिलन ; आमचे बापू का दूर बाबा !

Next Post

भावजी असे का हो ! मिसेस आल्या एमआयएमतर्फे निवडून पण मिस्टर गेले राष्ट्रवादीत ; पुण्यात अजित, अण्णांनी साधला बनसोडे योग

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995589
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group