राष्ट्रीय काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धा जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सहकार्याने स्पर्धा होत आहे अशी माहिती संयोजक सोलापूर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये लाखोंचे रोख पारितोषक व चषक,आकर्षक बक्षीस ठेवलेले आहे.रोख पारितोषक अनुक्रमे 51 हजार, 31 हजार, 11 हजार असून हे सर्व सुरेश हसापुरे यांच्या मार्फत देण्यात येणार आहेत. ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये सहा संघ मालकांना 72 खेळाडू देण्यात आले. स्पर्धा तीन दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा, रामवाडी मैदान सोलापूर मॅटवर खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेचे उदघाटन दि 22 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ 24 डिसेंबर 2023 सायंकाळी 7.00 वाजता आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व इतर मान्यवरांच्या यांच्या उपस्थित होणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत नियोजन समिती प्रमुख शिवशरण नुला, गोपाल दोडमनी, गणेश ढाळे, चंद्रकांत नाईक, धीरज खंदारे उपस्थित होते.