ब्रेकींग ! सोलापुरात भीम आर्मीने महापालिका आयुक्तांच्या गाडीला घातली गटारच्या पाण्याने अंघोळ
सोलापूर : सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेचे पाणी घुसत असल्याने आणि नळाला दूषित पाणी येत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी सामाजिक संघटनेचे शहर संघटक अजय मैंदर्गीकर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय वाहनावर ड्रेनेचे पाणी टाकून निषेध नोंदवला.
अजय मैंदर्गीकर हे सोमवारी सकाळच्या सुमारास महापालिकेत आले. त्यांच्यासोबत परिसरातील महिला उपस्थित होत्या. या भागातील दुर्गंधीमुळे वैतागलेल्या महिला आणि मैंदर्गीकर यांनी ड्रम मध्ये आणलेले घाण पाणी महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ओतले. तेव्हा त्या ठिकाणी बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी मैंदर्गीकर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
दिलेल्या निवेदनात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान रिक्षा स्टॉप ते पंचशील तरुण मंडळ येथील मस्जिद पर्यंतचा रस्ता सिमेंट काँकरीट करून देण्यात यावा, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलून नवीन व मोठी लाईन करून देण्यात यावी, संपूर्ण नगरातील रस्ते हैं सिमेंट काँकरीट करण्यात यावे, नगारातील सर्व सार्वजनिक शौचालये दुसरस्त करण्यात यावे, या सर्व मागण्या 15 ऑगस्ट च्या आत पूर्ण करण्यात याव्या अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघ्यानेच्या वतीने सोलापूर महानगर पालिके मधे 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिवसाचे ओचित्य साधून तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.