कॉंग्रेसचे सुरेश हसापुरे यांचा
सोलापुरच्या न्यु जॉगर्स फॉंडेशनला मदतीचा हात
सोलापूर : कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष व दक्षिण सोलापूरचे नेतृत्व सुरेश हसापुरे यांनी सकाळी नेहरुनगर शासकीय मैदान येथे भेट दिली. यावेळी न्यु जॉगर्स फॉंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंके व उपाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील विजापुर रोड परिसरातील अनेक खेळाडू, तरुण, महिला, मुले, जेष्ठ नागरिकांना नेहरुनगरचे शासकीय मैदान हे खेळांच्या सरावासाठी व व्यायामासाठी अत्यंत उपयोगी आहे. याठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी खेळाडू व नागरिकांची व्यायामासाठी मोठया संखेने हजेरी असते. हसापुरे यांनी मैदानातील उपलब्ध विविध सोयी सुविधा विषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी न्यु जॉगर्स फॉंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंके, कार्याध्यक्ष उन्मेश कमलापुरे, उपाध्यक्ष हेमंत जाधव, कोषाध्यक्ष दिलीप कदम व इतर सभासदांनी मैदानामध्ये नुकतेच वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मैदानावर आणखी काय सुधारणा सोयी सुविधा हव्या आहेत. या विषयीही माहिती दिली. प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार
हसापुरे यांनी तात्काळ नेहरु नगर शासकीय मैदानावर खेळाडू व नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा करण्यासाठी पन्नास हजाराचा विकास निधी न्यु जॉगर्स फॉंडेशनचे अध्यक्ष सुहास साळूंखे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी फॉंउडेशनचे सहसचिव विजय झाकणे, माजी अध्यक्ष संतोष कदम, दीपक नलावडे, सभासद विरेश नसले, काशिनाथ औरसंग, आनंद कटप, मनोज जकोटिया, पंकज वाघमोडे, सतीश घोडके, शशी कोळेकर, श्री हत्ताळे, श्री सुतार आदि उपस्थित होते.