सोलापुरात ऑल इंडिया समता सैनिक दलाचे निवेदन ; या आहेत महत्त्वाच्या मागण्या
सोलापूर : ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या सोलापूर युनिटच्या वतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष वैशाली उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.
बिहार राज्यातील बुद्धगया विहार अधिनियमित हस्तक्षेप करणे हेतू तसेच महाबोधी विहारावर बौद्धांचे नियंत्रण मिळण्याबाबत अधिनियम १९४९ च्या विरोधात तात्काळ हस्तक्षेप करण्याबाबत विनंती करण्यात आली.
ऑल इंडिया समता सैनिक दलाने दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
१) बुद्धगय विहार अधिनियम १९४९ ला ही धार्मिक अधिकारांचे उल्लंघन स्वरूपात मान्यता मिळावी.
२) भारत सरकार अधिनियम १९४९ यांच्यामध्ये दुरुस्ती करून महाबोधी विहाराचे पूर्ण नियंत्रण हे बौद्ध लोकांना हस्तांत हस्तांतरीत करावे तसेच बौद्ध भिकू आणि कार्यकर्ते उपोषण करीत आहेत, त्यांच्यावरती असंविधानिक मार्गाने कारवाई करू नये.