सोलापुरातून 802 किलोमीटर नवीन शक्तीपीठ महामार्ग जाणार ; वाचा हि महत्त्वाची बातमी
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शक्तीपीठे जोडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 802 किलोमीटर लांबीचा नवीन शक्तीपीठ महामार्ग बनवला जाणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील पत्रादेवी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील बांधा पर्यंत हा महामार्ग बनविण्याच्या प्रस्तावाला शासनाने तांत्रिक आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. याबाबतचा आदेश नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
हा महामार्ग यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या बारा जिल्ह्यातून जाऊन कोकणाला मिळणार आहे. माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अक्कलकोट आदिशक्ती पीठे या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जाणार आहे. त्यामुळे सोलापूरला या माध्यमातून आणखी एक नवीन महामार्ग मिळणार आहे. (साभार yes news)