सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा हि गड्डा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या यात्रेत बाराबंदी या पोशाखाला महत्व आहे. सात ही नंदीध्वजासह भाविक बाराबंदी हा पोशाख परिधान करून यात्रेत सहभागी होतात.
सोलापूरला येणारे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी काही अधिकारी यापूर्वी बाराबंदी परिधान केलेले पहायला मिळाले. बाराबंदी घालण्याचा मोह यंदा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आवरला नाही. त्यांनी हा पोशाख घालूनच यात्रेला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत माजी खासदार अमर साबळे ही बाराबंदी वेशात आले. राज्याचे माजी मंत्री भाजप नेते लक्ष्मण ढोबळे हे सुद्धा बाराबंदी वेशात दिसून आले.
पालकमंत्र्यांना बसण्यासाठी यंदा संमती कट्ट्याजवळच विशेष अशी व्यवस्था करण्यात आली. पालकमंत्र्यांसोबत आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त शितल तेली उगले बसले होते.