“विकासाचा वादा, अजित दादा” सोलापूरला दिले इतके कोटी ; किसन जाधव यांनी मांनले आभार
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विकासाच्या दृष्टीने दुहेरी जल वाहिनी साठी 76 कोटी, उड्डाणपुलासाठी 60 कोटी, हुतात्मा स्मृती मंदिर साठी 3.36 कोटी, दुबार तिबार पंपिंग साठी 3.56 कोटी शहरातील नाले विकसित करणे पहिला हप्ता 99.75 कोटी, अमृत योजना 2 मधून पाणी पुरवठा योजना DPR मान्यता 882 कोटी निधी मंजूर केलेला आहे.
सोलापूरच्या विकासाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील आहे. मी गेल्या वर्षभरापासून अजित पवार यांना सोलापूरच्या पिण्याच्या दुहेरी पाईप लाईन व विविध योजने करिता निधीची मागणी करत होतो त्याचप्रमाणे प्रशासनाकडून सुद्धा तशाच प्रकारचा प्रस्ताव सादर झालेला आहे.
ते सोलापूर दौऱ्यावर असताना सदर योजनेबद्दल माहिती घेतली आणि त्याच बैठकीत सदरचा निधी मंजूर करण्यात आला. काही दिवसात 31 मार्च च्या आत आचारसंहिता लागण्या अगोदर सोलापूर महानगरपालिका मध्ये निधी प्राप्त होईल.