Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धनंजय महाडीकांच्या भीमा परिवाराचा निर्धार ; राम सातपुते यांना खासदार करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 April 2024
in Election
0
धनंजय महाडीकांच्या भीमा परिवाराचा निर्धार ; राम सातपुते यांना खासदार करणार
0
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धनंजय महाडीकांच्या भीमा परिवाराचा निर्धार ; राम सातपुते यांना खासदार करणार

सोलापूर : विकासाचा ध्यास घेतलेले आता राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेचे खासदार करण्यासाठी भीमा परिवार सिंहाचा वाटा उचलणार आहे असा निर्धार भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे शुक्रवारी भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात झाला. यावेळी भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक खासदार धनंजय महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, पुळुजचे सरपंच विश्वास महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, चरणराज चवरे, सुशील क्षीरसागर, विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, सतिश काळे, शंकरराव वाघमारे, भाजपा पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसट, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भीमाच्या कार्यक्षेत्रातुन मोठे मताधिक्य आम्ही मिळून देऊ. राम सातपुते व मी मिळून केंद्रातील मोठा निधी आणून सोलापुरातील विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू.

भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणारा मी कार्यकर्ता आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न, वीजेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य राहणार आहे. सोलापूरकर जिल्ह्यातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही उमेदवार सातपुते यांनी याप्रसंगी केले.

Tags: BJP vs CongressDhananjay mahadikMLA Ram satputeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

भागाईवाडीत महिलांच्या स्वागताने प्रणिती शिंदे भारावल्या !

Next Post

धक्कादायक ! शेकापचे नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन ; कर्मचाऱ्यांचा आधारवड हरपला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
धक्कादायक ! शेकापचे नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन ; कर्मचाऱ्यांचा आधारवड हरपला

धक्कादायक ! शेकापचे नेते बाबासाहेब करांडे यांचे निधन ; कर्मचाऱ्यांचा आधारवड हरपला

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986185
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group