Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

CM एकनाथ शिंदे यांनी केले पंढरपुरातील स्वच्छतेचं कौतुक ; जिल्हा परिषदेच्या स्वच्छता दिंडीचा उत्साहात समारोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 June 2023
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता दिंडीचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार मंगेश चव्हाण, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेलकांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अधिकारी संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, सुनिल कटकधोंड, मुख्य वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागील सतरा वर्षापासून अविरत ही स्वच्छता दिंडी निघते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. देशात आणि राज्यात स्वच्छता ही चळवळ निर्माण झाली आहे. स्वच्छतेचे बाबत लोक एवढे जागरूक झाले की त्याची प्रचिती आज पंढरपूरमध्ये आली. ही लोक चळवळ झाली त्याचे समाधान आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये दरवर्षी वारकरी संप्रदाय वाढत चालला आहे, त्यामुळे प्रशासनाची ही जबाबदारी वाढत चालली आहे. वारकऱ्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, दिवाबत्ती याचे नियोजन प्रशासनाने केले आहे आज मी पंढरपुरात पाहत आलो आहे, रस्ते पाहिले, मोबाईल टॉयलेट पाहिले त्याचे स्वच्छता दिसून आली हे पाहून समाधान वाटले यावर्षी चांगले नियोजन झाले आहे. त्यामुळे मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, समन्वय मंत्री गिरीश महाजन व तानाजी सावंत यांना धन्यवाद देतो आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनंदन करतो.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना आषाढी वारीमध्ये जिल्हा परिषदेने राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यंदा महिला वारकऱ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. महिला वारकऱ्यांसाठी प्रथमच स्नानगृह उभारण्यात आले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा हजार वारकऱ्यांना एकात्मिक निवारा केंद्र उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभि गायक मोहम्मद अयाज यांच्या आवाजात महाराष्ट्र गीत सादर झाले. सर्व मान्यवरांना वारकरी फेटा घालून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री KCR यांचा प्रश्न ; CM शिंदेंचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन पहा….Video .

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त CM एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न ; CM शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातले हे साकडे ; या जिल्ह्यातील काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आषाढी एकादशीनिमित्त CM एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न ; CM शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातले हे साकडे ; या जिल्ह्यातील काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group