सतत पक्ष बदलत आलेले लक्ष्मण ढोबळे हे ‘ पलटूराम’ “जिकडे जाऊ तिकडे खाऊ”
माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत हिंदू दलित ही नवी व्याख्या त्यांनी आणली असून या व्याख्येनंतर त्यांच्यावर आंबेडकरी समाजातून टीका होत आहे.
सोलापुरातील स्थानिक भाजपचे जुने कार्यकर्ते तथा सोलापूर राखीव लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी ढोबळे यांच्यावर टीका केली आहे.
लक्ष्मण ढोबळे हिंदू दलित शब्दावरून सापडले पत्रकारांच्या तावडीत
ते म्हणाले, अलीकडील काही काळात लक्ष्मण ढोबळे यांनी सतत वादाची मुद्दे पुढे आणून आपला स्वतःचा स्वार्थ साधला आहे. बौद्ध हिंदू महार समाजाची मते घेऊन आयुष्यभर पोट भरलेले आहेत. सतत पक्ष बदलत आलेले ढोबळे हे पलटूराम आहेत. जिकडे जाऊ तिकडे खाऊ असे त्यांनी काम केले आहे.
त्यांची कन्या कोमल ढोबळे बीआरएस पक्षाच्या संपर्कात होत्या त्या अजून भाजपात आल्या नाहीत आणि त्यांना उमेदवारी द्या म्हणून त्यांची धडपड सुरू आहे.
चर्चेत राहण्यासाठी अनेक वेळा वादाची मुद्दे पुढे आणण्यासाठी ढोबळे यांची धडपड सुरू आहे हे अनुसूचित जातील सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या त्या विधानाला महत्त्व देणे योग्य वाटत नाही.