मोठी ब्रेकिंग ! सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीची माघार ; राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज काढला? ; जिल्हाधिकाऱ्यांनी वंचितच्या जिल्हाध्यक्षाला का ठेवले काही वेळ पोलिसांच्या ताब्यात
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सर्वात मोठी ब्रेकिंग समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली राहुल गायकवाड हे दुपारी पाहुणे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले.
त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले हे जेव्हा सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना समजले तेव्हा काहीजण पळत पाठीमागे आले. राहुल गायकवाड हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये होते याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे हे आत घुसले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मडीखांबे यांना पोलिसांना ताब्यात घेण्याचे सूचना केल्या. यानंतर राहुल गायकवाड माघार घेऊन गुपचूप माध्यमांशी ही न बोलता निघून गेले.
पोलिसांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे यांना दहा ते पंधरा मिनिटे आपल्यासमोर बसून घेतले होते त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिले पोलिसांनी सोडल्यानंतर मडीखांबे यांनी सुटकेचा विश्वास टाकला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने सोलापूर चा राजकारणात खळबळ उडाली आहे सर्व स्थानिक नेत्यांचेही चेहरे पडले होते विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनाही याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याचे समजते.