बाबासाहेब हे दलित व महाराष्ट्राचे, घटना त्यांची म्हणून भाजपाला आकस ; उध्दव ठाकरेंचा आरोप ; धाराशिव मध्ये “मोदी तुम्ही हे केलेच पाहिजे” !
सोलापूर : भाजपचे घटना बदलण्याचं स्वप्न आहे, म्हणूनच 400 पार म्हणत आहेत, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते आणि दलीत होते भारतीय राज्यघटना त्यांनीच लिहिली म्हणून घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे, मोदीच्या पोटात मुरडा उठतो तो तोच आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आरोप केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची कर्णिक नगर येथील मैदानात भव्य अशी सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा शब्दात शरसंधान साधले.
ते म्हणाले, प्रणिती तुझी चार जुनची तयारी जोरात आहे, आज मी सोलापुरात आलोय त्यांना गाढा म्हणून सांगायला. सुशीलकुमार शिंदे व बाळासाहेब ठाकरे चांगले मित्र होते, राजकारण व मैत्री भेसळ होऊ दिली नाही, हल्ली कुणाला मित्र म्हणावं हे अवघड आहे त्यासाठी पाठ सांभाळावी लागते, कधी पाठीत खंजीर खुपसतील सांगता येत नाही, मोदी हे कोपराला गूळ लावायचा काम करीत आहेत.
आज ते नकली सेना बोललो, मी काय सोडणार आहे का? धाराशिवला येताय माझी मागणी आहे, माझ्या तुळजा भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या, उद्या भाषणाची सुरुवात करताना, जय भवानी बोला जर बोलला नाही तर माझ्या महाराष्ट्र बद्दल आकस असेल हे सिद्ध होणार.
या भगव्या टोप्या नाहीत या पेटलेल्या मशाली आहेत, या मशाली च्या धगेत कमल जळून जाईल, मोदी तुम्हाला, अटलजी केराच्या टोपलीत टाकत होते, पण तुम्हाला दहा वर्ष भोगायला मिळाली नसती, शिवसेना सोबत होती म्हणून सत्तेत बसलात, आम्हाला नकली सेना म्हणता तुमचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झाला आहे. ज्या ज्या तख्तापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही पाहत आहात यंदा शिवसेना तुम्हाला त्या तख्तावर बसू देणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,
फडतूस बोललो होतो त्यांना राग आला पण आता बोलत नाही, टरबुज हे उन्हाळ्यात कामी येते, आता चिराट झाले आहे, मोदी तुम्हाला कडवट शिवसेना नको आहे, एक अकेला सब पे भारी, आजू बाजूला भ्रष्टाचारी अशी अवस्था तुमची झाली आहे. अटलजी यांचा आत्मा आज रडत असेल कुणाच्या हातात मी देश दिला, शिवसेना प्रमुखांनी घराणेशाही चालत नाही, मी माझ्या सात पिढ्यांचा इतिहास मांडायला तयार तुम्ही तुमचा मांडा, लोक ठरवतील कुणाची घराणेशाही चांगली,
आरक्षण बदलणार नाही म्हणता, मराठा समाज गेल्या पाच वर्षात आरक्षणासाठी झगडतो आहे, धनगर समाज आरक्षण मागतो, 50 टक्केच्या पुढे आरक्षण देणे हे संसदेत होते पण तुम्ही आरक्षणाचा निर्णय का लोकसभेत घेतला नाही हे उद्या सांगा,
भाजप म्हणजे ब्रम्हदेव नाही, नकली म्हणून हिनवता शिवसेना ही तुमच्या सारखी नकली डिग्री नाही,
खासदार कोण होते, स्वामींच्या प्रमाणपत्राचा प्रश्न अमरावती सारखा सोडवायचा होता ना स्वामी तुम्ही तुमच्या शक्तीने शाप द्या त्यांना, ये पब्लिक है सब जानती है,
कोरोनाची लस बनली ती महाराष्ट्रात पुण्यात बनली, देशात नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला होता, हेच तुम्हाला बघवले नाही.
प्रणिती तुझा आवाज लोकसभेत ऐकायचा आहे, प्रणिती तुला मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद द्यायला आलोय, आशीर्वाद नुसता शाब्दिक नको आहे, बाहेरून आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका, अस्सल सोलापूरकराला निवडून देणार. प्रणीतीचा विजय साधा सुदा नकोय, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा आहे असे आवाहन त्यांनी केले.