अक्कलकोटच्या ‘बिडलां’चा वाद ‘ पेटला’ ! आमदाराचे ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार घेऊन सिद्धाराम म्हेत्रे झेडपीत
सोलापूर : माजी मंत्री अक्कलकोटचे नेते सिद्धाराम म्हेत्रे हे आपल्या समर्थकांसह बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस नेते अशपाक बलोरगी, पंडित सातपुते, नितीन ननावरे, विनीत पाटील, सोमनाथ चिकलांडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हेत्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्यापुढे अक्कलकोट व दक्षिण तालुक्याच्या उपअभियंता बिडला यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करण्यात आली. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामा संदर्भात एनओसी दिली जात नसल्याचे सांगितले.
दरम्यान माध्यमांशी बोलताना म्हेत्रे काय म्हणाले पहा हा व्हिडिओ..