विधानसभा निवडणुकीनंतर नितेश राणे तुझे भुंकणे बंद करणार ; सोलापुरात एमआयएम नेते शाब्दी यांचा इशारा
सोलापूर : मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्या निषेधार्थ एम आय एम पक्षाच्या वतीने मुंबईत 23 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर सोमवारी होणाऱ्या मुंबईतील मोर्चाला सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाण्याचा निर्धार करण्यात आला. यानंतर शाब्दी यांनी पत्रकारांचे संवाद साधला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईत होणार आहे. एमआयएम पक्षाच्या मोर्चानंतर राज्य सरकार रामगिरी महाराजांना निश्चित अटक करेल असा विश्वास व्यक्त करताना शाब्दी यांनी सोलापुरातील सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
दरम्यान नितीश राणे यांच्या बद्दल बोलताना या विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएम त्याचे भुंकणे बंद करेल असा इशारा देताना देवेंद्र फडणवीस यांना हे आवाहन केले…