सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेला बोटावर मोजणे इतकेच चांगले अधिकारी लाभले आहेत. क्वचितच जणांनी आपलं नाव कमावलं तर अनेकांवर ठपका बसला. जिल्हा परिषदेमध्ये असे काही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाहिले की तीन साडेतीन वर्ष पदावर राहूनही त्यांना स्वतःचं नाव तर करता आलंच नाही परंतु जिल्हा परिषदेला ही त्यांनी न्याय दिला नाही.
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पाहिले तर अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर, डेप्युटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांच्या सारखे अधिकारी फार कमी पाहायला मिळतात. ते सत्ताधारी असो की विरोधक अशा सर्व राजकारणांसह प्रत्येक पत्रकाराचे मित्र आहेत. त्यांच्या कार्यालयात एखादा माणूस आला तर तो नाराज होऊन कधीच जात नाही. जर एखादे काम झालेच नाही तरी बाहेर पडणारा माणूस नाराज चेहऱ्याने जाताना दिसला नाही, त्या कामाचा पर्याय घेऊनच तो व्यक्ती बाहेर पडतो. जिल्हा परिषदेत येणारा असा कोणता राजकारणी नाही की जो संदीप कोहिणकर यांना न भेटता जाईल असे कधी झाले नाही.
अहमदनगर जिल्हा परिषदेमधून प्रमोशन होऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर संदीप कोहिनकर हे 2 जानेवारी 2023 रोजी जॉईन झाले. पदभार घेताच केवळ एका महिन्यातच त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आला. जलजीवन मिशनची विस्कटलेली घडी बसवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. अशातच जिल्हा परिषदेचे प्रशासकीय बजेट तयार करायची जबाबदारी. सुरुवातीला त्यांनी जल जीवन मिशनवर काम करताना अनेक अडचणी सोडवल्या, कामांमध्ये सुसूत्रता आणली त्यानंतर प्रशासकीय बजेट तयार केले.
त्या दीड महिन्यात त्यांनी समाज कल्याण विभागाच्या तब्बल 52 कोटीच्या प्रशासकीय मान्यतेसह जलसंधारण विभाग 10 कोटी, बांधकाम विभाग 20 कोटी, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत विभागाच्या जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र अशा एकूण सुमारे 100 कोटीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या. ‘जलजीवन’ च्या 170 कामांच्या वर्क ऑर्डर दिल्या.
21 जुलै रोजी जिल्हा परिषदेला थेट आयएएस असलेल्या मनीषा आव्हाळे या मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्या. सीईओ आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या कामाचा स्पीड प्रचंड आहे या स्पीड प्रमाणे कोहीणकर यांनीही आपल्या कामाचा स्पीड ठेवला आहे.
दरम्यानच्या काळात सोलापूर जिल्ह्याला ज्येष्ठ, अनुभवी व अभ्यासू राजकारणी असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री लाभले. अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये कामकाज करताना विखे पाटलांचा सहवास लाभल्याने सोलापुरात ही कोहीनकर यांना विखेंसोबत काम करताना कोणतीही अडचण झाली नाही.
कोहिणकर यांनी वर्षभरात विकास कामांना गती देण्यासह कामांच्या गुणवत्तेवर भर देत क्वालिटी कंट्रोल टीम नेमण्यात आली, समाज कल्याणच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास करणे या योजनेचा नव्याने आराखडा तयार केला. काम वाटप समितीचे कामकाज बंद पडलेले सुरू केले, लॉटरी काढून काम काम वाटप केले, ग्रामीण व्हिजीट वाढवल्या, लंपी आजाराच्या दरम्यान ग्रामपंचायत विभागाला सोबत घेतले. समाज कल्याण कृषी पशुसंवर्धन या विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये 10 टक्के त्यात महिला व दिव्यांगाना राखीव ठेवत तब्बल 75 टक्के लाभ दिला आहे.