सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे निवासी सोलापूरच्या युवकांची अमर साबळेंना पसंती
पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, सोलापूरात देखील दिवसेंदिवस प्रणिती शिंदेसमोर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण?याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. त्याच पार्श्वूमीवर राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. सोलापुरातून मोठ्या प्रमाणात पुणे येथे स्थलांतरित झालेल्या युवकांशी संख्या मोठी असून या युवकांचा सवांद मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात साबळे यांनी आपणास पुन्हा सोलापूरात आणून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे साक्षीदार आपणास करणे हा माझा पहिला अजेंडा असल्याचे सांगितले.
आळंदी येथे पुणे निवासी सोलापूरकर युवकांचा मेळाव्याचे आयोजन कपिल शिंदे व पुणे निवासी सोलापुरातील युवकांनी केले होते. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने व भाजप विशेष निमंत्रित सदस्य सागर अतनुरे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित युवकांशी अमर साबळे यांनी सवांद साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी आपण आपल्या सोलापुरातील मित्र परिवार व कुटुंबातील लोकांना भारतीय जनता पार्टीस मतदान करण्याचे आवाहन करावे असे प्रतिपादन केले व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सोलापुरातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत पाठवावा असे आवाहन देखील आपल्या मनोगतात केले.
याप्रसंगी उपस्थित तरुणांनी सोलापूरचे पुढील खासदार म्हणून आपणासारखे अभ्यासू नेतृत्व ज्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे व राज्यसभेत आपली कामगिरी पाहता नक्कीच आम्हा युवकांसाठी आपण आशेचे किरण असून आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून यावे अशी मागणी उपस्थित युवकांनी केली.