बाबा कारंडे यांना विरोध ; शंकर चौगुले झाले बिनविरोध , मुजीब शेख व्हॉईस चेअरमन; लेबर फेडरेशन चेअरमन निवडणूक ठरली लक्षवेधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमन पदी शंकर चौगुले तर व्हॉईस चेअरमन पदी मुजीब शेख यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान आवताडे यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले.
निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक वाजता फेडरेशनच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी
शंकर चौगुले, चंद्रकांत अवताडे, मुजम्मिल हुसेन शेख, बाबा कारंडे, राजू हरिश्चंद्र सुपाते, शिवाजी चव्हाण, श्याम पितांबर पवार, रोहिदास राठोड, मानसिंग नारायण खंडागळे, अरुण वामनराव घोडके, संजय नामदेव साळुंखे, यशवंत भारत शिंदे, अरुण भगवान थिटे, बाळासाहेब जालिंदर बागल, पार्वती विजय गाडे, सरस्वती अनंत साठे,लक्ष्मण कामू मस्के, वसंत कुबेर क्षीरसागर हे सर्व अठरा नूतन संचालक उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रमानुसार विहित वेळेत चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून चौगुले शंकर सोमण्णा व शिंदे भारत यशवंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. विहित वेळेत शिंदे यशवंत भारत यांनी त्यांचे उमेदवारी मागे घेतल्याने चौगुले शंकर सोमण्णा हे चेअरमन पदी अविरोध निवडून आले आहेत. तसेच व्हा चेअरमन पदासाठी मुझ्झमिल हुसेन अ.शेख यांनी व खंडागळे मानसिंग नारायण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यापैकी विहित वेळेत खंडागळे मानसिंग नारायण यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने मुझ्झमिल हुसेन अ.शेख हे व्हा. चेअरमन पदी अविरोध निवडून आले.
लेबर फेडरेशनच्या 18 संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर चेअरमन पदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, पुन्हा माजी चेअरमन बाबा कारंडे हेच होतील अशी पण चर्चा होती. पण पुन्हा कारंडे यांना विरोध झाला आणि आमदार समाधान आवताडे समर्थक संचालक शंकर चौगुले यांचे नाव समोर आले. व्हाईस चेअरमन पदासाठी दक्षिणचे संचालक मुजम्मिल शेख यांचे नाव दूध संघाच्या संचालक सुरेश हसापुरे यांनी पुढे आणले.
या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटातील बारा सदस्य होते तर दुसरीकडे माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील सहा सदस्य होते. या या निवडीत सुमारे 35 वर्षानंतर वडार समाजाच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे त्यानंतर प्रथमच वाईस चेअरमन पदावर अल्पसंख्यांक समाजातील मुजमिल शेख यांची निवड झाली आहे तसेच कामवाटप समितीवर मंगळवेढ्याचे श्याम पवार तर कार्यकारी संचालक म्हणून सचिन कल्याणशेट्टी समर्थक रोहिदास राठोड यांच्या निवडी झाल्या आहेत.
निवडीनंतर खान क्रशर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, संजय लिंबोळे, बालाजी निंबाळकर, शिवाजी चव्हाण, राजू चौगुले, सिद्धू अण्णा पाटील, सुजित अडूनगी, सिद्धेश्वर रोजमाने, मल्लू नागोजी, बालाजी विठ्ठलवार, सतीश जंगले, अभिराज शिंदे, सुशील वाघचौरे, मारुती आळवेकर, दशरथ पवार यांनी नूतन चेअरमन शंकर चौगुले यांचा सत्कार करत जल्लोष साजरा केला.