सोलापूर : सोलापुरात लोकसभेच्या खासदारकीची राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केल्याने चांगलेच वातावरण ढवळून निघाले. ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी सोलापूर लोकसभेवर दावा केल्याने आणि त्यांनी तशी तयारी सुरू केल्याने काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमध्ये टेन्शन दिसून आले. अशातच आमदार रोहित पवार यांचा दौरा झाला त्यांनीही सोलापूरची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता कोण रोहित पवार? असे म्हणून त्यांनी खिल्ली उडवली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. युवक नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर वक्तव्य केले त्याला उत्तर म्हणून माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी जुबेर बागवान यांना उत्तर देताना तुम्ही किमान मीना बाजारचे संचालक तरी होऊन दाखवावे असे थेट चॅलेंज केले होते.
दरम्यान आता रमजान महिना सुरू आहे सोलापुरातील विजापूर वेस परिसरात मीना बाजार भरतो. या मीना बाजारचे संचालक म्हणून जुबेर बागवान यांची निवड झाली आहे. एक प्रकारे मुस्लिम समाजाने बाबा करगुळे यांच्या केलेल्या चॅलेंजला ही निवड करून जोरदार उत्तर दिल्याचं पाहायला मिळतय.

















