सोलापूर : महाआवास योजनेच्या विषयाची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, प्रभारी प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी यांच्यासह गटविकास अधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआवास योजनेच्या कामात सोलापूर जिल्हा हा राज्यात खालून चौथ्या क्रमांकावर आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ही बैठक झाली. घरकुल योजनांचा सविस्तर आढावा झाला.
सीईओ स्वामी यांनी घेतली शिक्षण मंत्री केसरकर यांची भेट ; काय झाली नेमकी चर्चा
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी कारवाईच्या भूमिकेत दिसले. बैठकीला उपस्थित ग्रामसेवक संघटनेच्या नेत्यांना तंबी दिली. ते म्हणाले, माझ्या जिल्ह्यात एकही माणूस बिना घरावा व बिना नळाचा नसला पाहिजे. प्रत्येकाला घर बांधून देणे, पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. ज्या गावात घरकुलचे काम कमी झाले तिथे नळजोडणी सुद्धा कमी झाली हे नक्की आहे. सर्व विषयात आपण टॉपवर असताना घर बांधणीत मागे का? आपण निश्चित कुठे तरी कमी पडतोय हे मान्य करायला हवे. आजच डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासनाला सांगितले आहे की, ज्या गावात ग्रामसेवकांचे काम समाधानकारक नाही अशा प्रत्येक तालुक्यातील 2 ग्रामसेवकाना निलंबित करा, परंतु अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी आठ दिवसांची मुदत देण्यास सांगितले म्हणून मी गप्प आहे. आठवड्यात झाले नाही तर ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ या भूमिकेत मी राहणार आहे. या बैठकीत काय म्हणाले सीईओ पहा हा व्हिडीओ


















