राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी लोक माझे सांगाती य पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आपण अध्यक्ष पद सोडत असल्याचा निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभर आंदोलने झाली, सोलापूरात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
दरम्यान शरद पवार यांनी दोन दिवसानंतर म्हणजेच 5 मे रोजी पत्रकार परिषद घेत अध्यक्ष पदाबाबत घेतलेला निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर करताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यानी जल्लोष केला, तसेच जयंत पाटील यांच्या आदेशाने सोलापुरातील युवकांनी देखील शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतल्याबद्दल सात रस्ता येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर दिवाळी साजरी करून मिठाई वाटप केली.
शरद पवार यांनी निर्णय मागे घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून कार्यकर्ते जोमाने काम करतील, पवार साहेबांनी निर्णय मागे घेतल्याने सोलापूरात दिवाळी साजरी केल्याचे सेवादलचे शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, आणि युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर म्हणाले.
यावेळी सरफराज शेख, लखन गावडे, गफूर शेख, संपन्न दिवाकर, महेश कुलकर्णी, मूसा अत्तार, ज्योतिबा गुंड, अक्षय जाधव, अमित सुरवसे, रियाज शेख, ऋषिकेश शिंदे, शाहरुख हूच्चे, विकास शिंदे, किरण शिंदे, शहानुर छप्परबंद, सचिन खंडागळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















