सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोलापुरात मुक्काम केला. सकाळी साडेआठ वाजता त्यांनी हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी सोलापूरच्या लोकसभेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मागत आहेत यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र बसतो चर्चा करतो आताच जागा मागणीची चर्चा करणे योग्य नाही अन्यथा वातावरण सुखद होणार नाही त्यामुळे ही चर्चा नको असे म्हणून त्यांनी या मागणीला पूर्णविराम दिला.
राज्यातील एकूणच वातावरण पाहता महा विकास आघाडीमध्ये सध्या चाललय काय या प्रश्नावर त्यांनी काही काळजी करू नका सर्व ठीक आहे असे हसत उत्तर दिले. पहा नक्की शरद पवार काय म्हणाले


















