सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी बालाजी सरोवर या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर भारत जाधव यांनी पवारांच्या कानात सांगितले की, दोनच दिवसांपूर्वी आपले मुस्लिम समाजाचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख यांचा वाढदिवस झालेला आहे. आपल्या हस्ते आपण सत्कार करावा अशी विनंती केली. या विनंतीला मान देऊन पवारांनी लगेच तौफिक शेख यांना आपल्या जवळ बोलावून घेतले आणि त्यांचा विशेष सत्कार केला. या सत्काराने निश्चितच तौफिक शेख यांच्यासह त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते ही भारावून गेल्याचं दिसून आलं.



























