सोलापूर : मुरारजी पेठेतील जुनी मिल कम्पोंड इथल्या द स्केअर मॉल मध्ये हल्क जीमचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. जिमचे उद्घाटन विजयंता साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनक पारवे यांच्यासह कुटुंबातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाळ, माजी नगरसेवक विनोद गायकवाड, माऊली पवार, संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, युवा उद्योजिका शुभा दुलंगे, यांच्यासह बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मान्यवरांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. जिमचे प्रमुख समर्थ पारवे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
या जिममध्ये व्यायामासाठी फॅन्क्शन ट्रेनिंग, क्रॉस फिट, पर्सनल ट्रेनिंग, कार्डिओ ॲक्टिव्हिटी, फॅट लॉस, वेट लॉस, वेट ट्रेनिंग, नुट्रिशन स्टोअर्स असे प्रकार आहेत.

























