Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषद LKG -UKG वर्ग सुरू करणार ; शिक्षण परिषदेत झाली महत्वपूर्ण चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 May 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय शिक्षण परिषद एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, शिक्षण अधिकारी योजना सुलभा वटारे, डायट वेळापूरचे प्राचार्य डॉ रामचंद्र कोरडे, अधिव्याख्याता डॉ इब्राहिम नदाफ, अधिव्याख्याता डॉ क्रांती कुलकर्णी, डॉ इरफान इनामदार, पर्यवेक्षिक राजश्री जंबेनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असे क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 200 अधिकारी परिषदेस हजर होते.

जिल्हा परिषद शाळेत प्रायोगिक तत्त्वावर LKG व UKG चे वर्ग सुरू करण्याची कल्पना मांडताना स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घ्या असे सांगत जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले पाहिजे अशा सूचना केल्या. एलकेजी युकेजी वर्ग सुरू करणे धोरणात नसले तरी आपण प्रायोगिक तत्त्वावर सुरू करू शकतो त्याला कोणतीही हरकत नाही जर आपण प्रभावीपणे हे वर्ग चालवले तर निश्चितच राज्यात ही संकल्पना राबवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिषदेत विद्यार्थी आधार अपडेशन व संचमान्यता याविषयी माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वटारे यांनी विविध शासकीय विद्यार्थी लाभार्थी योजनांची माहिती दिली. 

मुख्यालयातील विस्तार अधिकारी श्रीमती स्वाती स्वामी यांना स्वच्छता अभियान अंतर्गत लेट्स चेंज या उपक्रमात राज्यस्तरावरील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हा राज्यात बेस्ट ऑफ फाईव्ह ठरल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

प्राथमिक शिक्षणाधिकारी जावीर यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, रतिलाल भुसे, अतहर दफेदार, अधीक्षक प्रताप रुपनर, संगणक प्रोग्रामर इम्तियाज चंदरकी, अब्बास शेख यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजपच्या विजय चौकात काँग्रेसने केला कर्नाटक विजयाचा जल्लोष ; कार्यकर्त्यांचा डान्स पहाच एकदा

Next Post

सुशिलकुमार शिंदे यांनी केले आमदार प्रणिती शिंदेंचे अभिनंदन! ‘दावणगिरी होल बीडरी’ जनवात्सल्य समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुशिलकुमार शिंदे यांनी केले आमदार प्रणिती शिंदेंचे अभिनंदन! 'दावणगिरी होल बीडरी' जनवात्सल्य समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002235
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group