पूजा जगदीश हलकुडे यांना ‘बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन’ या विषयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. ‘ग्रीन मार्केटींग प्रॅक्टिसेस ऑफ सिलेक्ट फार्मा कंपनीज इन वेस्टर्न महाराष्ट्र’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय असून ‘एच. व्ही. देसाई कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स’, पुणे या रिसर्च सेन्टर मधील डॉ. अनिता साठे यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे .
पुजा हलकुडे यांचे शिक्षण एम कॉम, बीएड, नेट, सेट पीएचडी असून करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संजय आंबोले यांचे लहान बंधू यांच्या त्या पत्नी आहेत. सध्या पुणे येथील कावेरी कॉलेज येथे व्याख्याता आणि वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.


















