Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या या ‘कुमारां’चे नेटके व उत्तम नियोजन ; 102 डिग्री ताप तरीही होता दैवी ‘आशीर्वाद ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 January 2024
in Administration
0
सोलापूरच्या या ‘कुमारां’चे नेटके व उत्तम नियोजन ; 102 डिग्री ताप तरीही होता दैवी ‘आशीर्वाद ‘
0
SHARES
5.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Pm narendra modi meet kumar ashirwad

सोलापूरच्या या ‘कुमारां’चे नेटके व उत्तम नियोजन ; 102 डिग्री ताप तरीही होता दैवी ‘आशीर्वाद ‘

सोलापूर, दिनांक 20(जिमाका):- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रे नगर येथे 30 हजार घरांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे चावी वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौरा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. या दौऱ्याचे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनास फक्त सहा दिवसाचा कालावधी मिळालेला होता. अत्यंत कमी कालावधीत जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित घेऊन केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रे नगर येथील गृह प्रकल्प हा असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी राबविण्यात येत असलेला देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झालेले होते. मागील काही महिन्यापासून या गृह प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना चावी वितरण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री महोदय सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. म्हाडा, रे नगर फेडरेशन यासाठी प्रयत्न करत होते. 12 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री महोदय नाशिक व मुंबई जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्यात येऊन गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयातून दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री रे नगर येथील कार्यक्रमासाठी येणार असल्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. *प्रशासनाकडे कार्यक्रमाच्या तयारीसाठी फक्त सहा दिवस होते. व कमी कालावधीत दौरा विना विघ्न यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.

त्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुख व कार्यक्रमाच्या आयोजक रे नगर फेडरेशन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री कार्यालयास पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत रे नगरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व त्या ठिकाणी 40 ते 50 हजार लाभार्थी बसण्यासाठी व्यासपीठ व सभामंडप तयार करण्याच्या दृष्टीने जागेची निश्चिती करण्यात आली.

महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद यंत्रणा, महाडा, वीज वितरण, ग्रामीण पाणी पुरवठा व अन्य संबंधित विभागाचे अधिकाऱ्यावर प्रधानमंत्री कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या व त्यांची त्या जबाबदाऱ्यांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, म्हाडाचे अधिकारी श्री अटकले उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व अन्य विभाग प्रमुख यांनी दौरा नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. *पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रधानमंत्री यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी नियोजन करत होते.*

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेऊन सहा ते सात महिन्याचा कालावधी झालेला आहे. व त्यातच प्रधानमंत्री महोदय यांचा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सूक्ष्म व शिस्तबद्ध नियोजन केले.
कार्यक्रमाचे अनुषंगाने प्रत्येक विभागाला जबाबदारी देऊन ती जबाबदारी ते विभाग प्रमुख व्यवस्थितपणे पार पाडतात का यावर योग्य नियंत्रण ठेवून काम केले. कार्यक्रमाचे व्यासपीठ, सभामंडप, त्यात सेक्शन वाईज कशा पद्धतीने व्हीव्हीआयपी, व्हीआयपी ते सर्वसामान्य नागरिक, लाभार्थी कशा पद्धतीने बसतील याबाबतचे नियोजन, कार्यक्रमात व कार्यक्रम झाल्यावर सभा ठिकाणी स्वच्छता, नागरिकांना भोजन, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था, लाभार्थ्याला प्रधानमंत्री महोदय यांचे भाषण व सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहता यावा यासाठी जागोजागी मोठमोठ्या स्क्रीनची व्यवस्था तसेच पार्किंगच्या ठिकाणीही मोठ्या स्क्रीनची व्यवस्था, पोलिस बंदोबस्त या सर्व जबाबदारी प्रत्येकाकडून अत्यंत अचूकपणे करून घेण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले. प्रधानमंत्री महोदय यांचे हेलीपॅड ते राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हेलिपॅड पर्यंत व त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता काटेकोरपणे होती की नाही याची माहिती स्वतः प्रत्यक्ष जाऊन घेत होते. तसेच प्रत्येक विभाग प्रमुख यांच्याशी थेट संपर्क करून सर्व यंत्रणाचा परस्परात योग्य समन्वय कशा पद्धतीने राहील यासाठी त्यांनी केलेले नियोजन अत्यंत नेटके होते.

रे नगर येथील प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रचंड मोठ्या लोकांवर नियंत्रणासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त तसेच प्रधानमंत्री महोदय यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेला स्थानिक स्तरावरची सुरक्षेची व्यवस्था करण्याचे काम जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे बजावले.

प्रधानमंत्री यांच्या भाषणातील सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर यांचे मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मनी मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर तीर्थक्षेत्रा विषयी माहिती तसेच सोलापूर युनिफॉर्म निर्मिती व गारमेंटस ची मोठी बाजारपेठ असून सोलापूरची चादर जगात प्रसिद्ध आहे, या बाबींची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला दिलेली होती.

प्रधानमंत्री महोदय यांचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः सकाळी सात ते रात्री एक ते दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष सभास्थळी जाऊन नियोजन करत होते व केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येकाकडून कामकाज करून घेऊन आवश्यक त्या ठिकाणी बदल करून घेत होते. याच दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना 102 डिग्री ताप आला. परंतु त्यांनी त्याचीही परवा न करता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या कामात 102 डिग्री चा ताप ही अडसर ठरू शकला नाही. दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष नियोजनाप्रमाणे प्रधानमंत्री महोदय यांचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाचे व जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या प्रशासकीय कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंधरा हजार घरकुलाच्या पहिल्या टप्प्याचे चावी वितरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या टीमचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमासाठी आलेले अनेक नागरिक व लाभार्थी यांनीही कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले. एकंदरीत प्रधानमंत्री यांचा सोलापूर जिल्हा दौरा हा अलीकडील काळातील सर्वात यशस्वी दौरा झाला आहे.

Tags: @Solapur_visitAdam masterCollector kumar ashirwadPM narendra modi
SendShareTweetSend
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यात जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट काम ; डेप्युटी सीईओ व बीडिओंच्या कामाचे कौतुक

Next Post

शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झाले ; सोलापुरात उमेश पाटील यांचे जंगी स्वागत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झाले ; सोलापुरात उमेश पाटील यांचे जंगी स्वागत

शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झाले ; सोलापुरात उमेश पाटील यांचे जंगी स्वागत

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998502
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group