प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यात जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट काम ; डेप्युटी सीईओ व बीडिओंच्या कामाचे कौतुक
सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांच्या हस्ते कुंभारी शिवारात उभारण्यात आलेल्या असंघटित कामगारांच्या 30000 घरकुल प्रकल्पातील तब्बल 15000 घरांचे हस्तांतरण प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले या दौऱ्याचे केवळ सहा दिवसात नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे यांच्यासह सचिन खुडे, माणिकराव बिचकुले, आनंद मिरगणे, विनायक गुळवे, आनंद लोकरे, दिपक चिलवंत, बाळासाहेब वाघ, महेश पाटील, विनायक गुळवे या सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे पार्किंग व्यवस्था तसेच कार्यक्रमावर बंद अन्नपाकिटे वितरण ही जबाबदारी देण्यात आली होती.
या सोहळ्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या या टीमने अतिशय उत्कृष्ट असे काम केल्याचे पाहायला मिळाले या कामाबाबत स्वतः या अधिकाऱ्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामाचे कौतुक केले.