सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी संपन्न झाला.
दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस यांचे महसूल भवन या ठिकाणी आगमन झाले. रिबन कापण्याअगोदर ते पाच मिनिट थांबल्याचे पाहायला मिळालं. सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी आणि माढयाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही येईपर्यंत त्यांनी फित कापली नाही जेव्हा त्यांच्या शेजारी खासदार डॉक्टर स्वामी आले तेव्हा त्यांनी रिबीन कापली.
त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती.
कोनशिलेच्या उद्घाटनानंतर त्यांनी परिसरातील संविधान प्रास्ताविक शिलालेखाचे उद्घाटन केले. यावेळी प्रयास मागासवर्गीय संस्थेचे सचिन शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात येऊन त्यांनी काही वेळ पाहणी केली, त्यांच्या खुर्चीवर बसले त्यानंतर ते मीटिंग हॉलमध्ये शासकीय आढावा बैठकीसाठी गेले.




.jpg)




















