सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नूतन जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाची पाहणी करत असताना वयोवृद्ध प्राणी मित्र विलास शहा यांनी फडणवीस यांना निवेदन दिले. सोलापूर हैदराबाद रोडवर मुळेगाव इथल्या सोनंकुर कत्तलखाना बंद करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी फडणवीस यांच्याशी चर्चा करताना अचानक विलास शहा यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ माणुसकी दाखवत पाणी देण्याच्या सूचना उपस्थित प्रशासनातील कर्मचाऱ्यांना केल्या. परत त्यांच्याशी बोलताना नक्कीच तुमच्या निवेदनावर मी कार्यवाही करेल असे आश्वासनही फडणवीस यांनी शहा यांना दिले.

















