Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांची चिंचणी गावाला भेट ; सोबत होते आमदार सुभाष देशमुख ; असा कोणता होता कार्यक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर : योग्य नियोजन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास वेगाने आणि परिणामकारकरीत्या होईल असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी शनिवारी चिंचणी येथे बोलताना केले..


सोलापूर सोशल फाउंडेशन आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या कृषी पर्यटन क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे उद्घाटन करताना श्री स्वामी बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान सोलापूर सोशल फाउंडेशन चे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी भूषवले होते.

दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील पहिले तीन मध्ये निर्मलग्राम असलेले चिंचणी ने कचरा मुक्त ग्राम अभियानात देखील चांगले पाऊल टाकले आहे. कृषी पर्यटनाचे ठिकाणी स्वच्छता असेल तर सोन्याहून पिवळे आहे.


सध्या मासिक पाळी व्यवस्थापक सप्ताह आहे. या कालावधीत मासिक पाळी बाबत चे समज व गैरसमजा बाबत प्रबोधन करा. महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या. जैविक कचरा बरोबर वैद्यकीय कचरा कडे देखील गांभार्याने पहा. कोरोना मुक्त असलेले चिंचणी गावात मोहन अनपट सारखे तरुण युवकांनी चेहरामोहरा बदलला आहे. असेही स्वामी यांनी सांगितले.


स्वामी पुढे म्हणाले, गावाचा शाश्वत विकास करायचा असेल तर पुढच्या पिढीचा विचार करून शाळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. बालविवाहांच्या बाबतीत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे ही अतिशय कटू वस्तुस्थिती आहे असे सांगताना त्यांनी या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे विशद केले.


आपल्या गावात उपायोजना करताना केवळ व्यसनमुक्ती न करता व्यसनाच्या मूळ कारणांचा विचार केला पाहिजे आणि त्यावर घाव घातला पाहिजे, असे प्रतिपादन केले.


प्रभारी जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे आणि अतिरिक्त जीएसटी आयुक्त वैशाली पतंगे- ठोंबरे यांनीही उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन केले. ठोंबरे यांनी, ग्रामीण भागातल्या पर्यावरण प्रेमी उत्पादनांना शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगितले.


ठोंबरे यांनी, सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांच्या कल्पनांचा समावेश करून पूर्ण जिल्ह्याचा एक विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात येईल असे जाहीर केले. या कार्यशाळेत पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, पर्यटन तज्ञ रफिक नदाफ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय कुचेकर यांनी केले.


… तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल:आ. देशमुख

आमदार सुभाष देशमुख यांनी, अध्यक्षीय समारोप केला. सरपंच हाच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे सरपंचांनी निर्धार केला तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल, असे  प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गजानन भाकरे यांनी केले तर समृद्ध गाव समिती अभियान समितीचे अध्यक्ष मोहन अनपट यांनी चिंचणीच्या विकासाची सविस्तर माहिती दिली.

या कार्यशाळेस सोलापूर सोशल फाउंडेशन चे मुख्य समन्वयक विजय पाटील,विपुल लावंड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, सदस्य, सल्लागार, प्रतिनिधी उपस्थित होते


चिंचणी : रम्य पर्यटन स्थळ

पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव पुनर्वसित असून ते उत्तम कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. सध्या या स्थळाच्या ठिकाणी विविध संस्था संघटनांचे कार्यक्रम संमेलने आणि बैठका मोठ्या प्रमाणावर होत आहेत. भरपूर वृक्षारोपण केलेल्या या ठिकाणी रम्य वातावरणात सर्व सुख सोयी उपलब्ध असल्याने यावर्षी चिंचणीच्या पर्यटन स्थळामुळे महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे अशी माहिती मोहन अनपट यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

अखेर प्रभाग १३ मधील पाथरुट चौक ते गेंट्याल चौक डांबरीकरण रस्ते विकासकामांचा शुभारंभ ; खड्ड्यापासून होणार मुक्तता

Next Post

सोलापुरात मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात अतिशय महत्त्वाचा ठराव ; लग्नापूर्वी घातली यावर बंदी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात अतिशय महत्त्वाचा ठराव ; लग्नापूर्वी घातली यावर बंदी

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979061
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group