Friday, March 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात अतिशय महत्त्वाचा ठराव ; लग्नापूर्वी घातली यावर बंदी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापुर : मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू वर मेळाव्यात करण्यात आला या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून दिले  आहे त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता  प्री वेडिंग शूटिंग ला पायबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला .

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे – पाटील,जय हिंद शुगरचे चेअरमन बबुवान माने – देशमुख शिवसेनेचे  जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे , परिवहनचे माजी सभापती राजन  जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील,  जिल्हा समन्वयक दत्तामामा मुळे जिल्हा उपाध्यक्ष जी. के. देशमुख,  सदाशिव पवार , शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे , जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे , मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश  काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

हे पण वाचा (हा योगच होता, तेव्हा रत्नाकर गायकवाड होते आता मिलिंद शंभरकर आहेत परंतु, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचाही योग होताच)

प्रारंभी  छञपती  शिवाजी महाराज , जिजाऊ माँ साहेबांच्या  प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली प्रस्ताविक भाषणात  जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधू वर मेळाव्या घेण्यामागची भूमिका विशद केली. परिवहन सभापती राजन  जाधव यांनी आपल्या भाषणात समाजासाठी आशा वधू वर मेळाव्याची गरज आहे. मात्र विवाह सोहळा जमवण्याच्या माध्यमातून होणाऱ्या दलालीला आळा बसला पाहिजे त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे  यांनी देखील मार्गदर्शन केले. समाजातील विवाह परिस्थिती भयानक आहे. आई-वडिलांनी  व्यापक अपेक्षा न करता कर्तृत्ववान आणि सुसंस्कार मुलगा पाहून विवाह करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 


जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली .आई-वडिलांनी आपल्या मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलाची निवड करावी. साधेपणाने विवाह पार पाडावेत .विवाह सोहळ्याप्रसंगी केली जाणारी प्री वेडिंग शूटिंगवर पाय बंद घालावा .  तसा ठराव देखील या वधू वर मेळाव्यात केला गेला सर्व समाज बांधवांनी याला एकमताने पाठिंबा दिला.


हा वधू-वर मेळावा यशस्वी करण्यासाठी आर. पी. पाटील, अंबादास सपकाळे,  राम माने,  रमेश जाधव,  नवनाथ कदम, अभिजंली जाधव, शोभाताई गुटे,  नितीन जाधव,  कल्याण गव्हाणे, डॉ. संजिवनी पवार, सचिन चव्हाण, नितीन भोसले, सिद्धाराम वाघ, दिपक शेळके, संतोष जाधव, सचिन शिंदे, सुशिल गवळी, 2प्रवीण थोरात, गोवर्धन गुंड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी तर आभार दिनकर देशमुख यांनी मांडले.


या वधू वर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला शहर जिल्हा परिसरातील तब्बल 400 ते 500 वधू वर त्यांचे पालक हजर होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही वधू तर काही वरांनी आपला परिचय करून दिला यामध्ये डॉक्टर इंजिनीयर अशा उच्चशिक्षित वधू-वरांचा समावेश या वधू वर मेळाव्यात होता.


परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री वेडिंग शूटिंग वर लाख रुपये खर्च केले जातात आणि वैयक्तिक खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा  रुढ झाली आहे. याला  कुठेतरी आळा बसला पाहिजे प्री वेडिंग शूटिंग वर येणार खर्च गोरगरिबाच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून  देण्याचा सूर देखील या मेळाव्यात उपस्थित  मान्यवरांनी यावेळी काढला. भविष्यात एक गाव एक विवाह ही संकल्पना  मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढे  आणली  जाणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांची चिंचणी गावाला भेट ; सोबत होते आमदार सुभाष देशमुख ; असा कोणता होता कार्यक्रम

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी ; व्याख्यानाचे झाले आयोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी ; व्याख्यानाचे झाले आयोजन

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971029
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group