भगवा फाऊंडेशन मुंबई या संस्थेच्या वतीने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडील कर्मचारी तथा सोलापूर महापालिका चतुर्थश्रेणी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र मच्छिद्र साखरे यांना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी लोकमाता आहिल्यामाई राष्ट्रीय पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आलेला असून सदरहू पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा सन्मान चिन्ह आणि १५०००/- चे पुस्तके असे असून पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे.
यापूर्वी भालचंद्र साखरे यांना नामवंत सेवाभावी संस्थेकडून सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ गुवंत कामगार पुरस्कार, राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत कामगार पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, समता गुणवंत कर्मचारी पुरस्कार, समाजसेवक पुरस्कार, राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार, सयाजीराव गायकवाड पुरस्कार असे राज्यभरात विविध संस्थेकडून गौरविण्यात आले.
साखरे यांना लोकमाता आहिल्यामाई राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर शहरातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते जर्नादन शिंदे, चांगदेव सोनवणे, पत्रकार किरण बनसोडे, नंदकुमार येथे रामकृष्ण लांबतुरे, विजय भोईटे, साहित्यक बाबू बनसोडे, विकास चौधरी, श्रवण भंडारे, मनपा पतसंस्थेचे माजी चेअरमन मधुबाई ओव्हाळ, अमोल गायकवाड यांनी अभिनंदन केले..



















