सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालकपदी अहमदनगर तालुक्यातील कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल जाधव हे एक जून रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली.
नवे प्रकल्प संचालक अमोल जाधव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब इथले रहिवासी आहेत. त्यांनी कर्जत पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेमध्ये चांगले काम केले असल्याची माहिती आहे.
तत्कालीन प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांची बदली झाल्यानंतर पाणी व स्वच्छता विभागाला बरेच महिने पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्याकडे पदभार होता. परंतु आता या विभागाला अमोल जाधव यांच्यामुळे पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यानंतर अमोल जाधव हे सुध्दा अहमदनगर जिल्हा परिषदेमधूनच सोलापूरला आले आहेत.



















