सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांच्याही दौऱ्यात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. विधानसभेतील आपले जुने सहकारी जेष्ठ कामगार नेते आडम मास्तर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला जयंत पाटील विसरले नाहीत.
यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या सोबत माजी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी आमदार दीपक साळुंखे यांना घेऊन गेले होते. यावेळी पाटील यांचे आडम मास्तर सोबत बराच वेळ चर्चा झाली. शेवटी वाढदिवसानिमित्त सत्कार करताना बुके हा महेश कोठे यांच्याकडून मास्तर यांना द्यायला लावला. यावेळी कोठे यांच्याकडून शूभेच्छा घेताना मास्तरांनी आमच्या घरकुल योजनेचे शहर उत्तर मतदारसंघात दहा हजार सभासद आहेत लक्षात ठेवा, आम्ही निवडून आणतो तुम्हाला, येऊ नका आमच्याकडे (शहर मध्य). असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आडम मास्तर आणि महेश कोठे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. 2014 आणि 2019 या साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोठे- आडम यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पद्मशाली समाजाची मते विभाजन होऊन दोघेही पराभूत झाले. या निवडणुकीत एकमेकांच्या जातीवर जाण्याचा विषय झाला होता.




















