Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिकार सुशिलकुमार शिंदे यांना ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठका सुरु असून या माध्यमातून मतदारसंघातील स्थानिक नेतेमंडळी पदाधिकारी यांची मते जाणून घेतले जात आहेत. शनिवारी सोलापुर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, AICC चिटणीस आशीष दुआ, AICC चिटणीस सोनल पटेल, नसीम खान, कुणाल पाटील, मोहन जोशी, उल्हास पवार व राज्यातील इतर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मुंबई येथे संपन्न झाली.

या बैठकीत सोलापुर लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात सर्व अधिकार सुशीलकुमार शिंदे यांना देण्याचा ठराव एकमताने सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडला. आणि त्यास सोलापुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी अनुमोदन दिले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, काँग्रेसचे वातावरण चांगले आहे म्हणून गाफिल न राहता काँग्रेसचे संघटना मजबूत करा, लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहेत त्यासाठी तयारीला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांची माणसे आहे. सर्व समाजाला घेऊन जनतेची कामें करा. संघटना मजबूत असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. 

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्ह्याची संघटना खंबीर आहे, आज सर्व पदाधिकाऱ्यांनी सोलापुर लोकसभा निवडणूक संदर्भात एकदिलाने शिंदे साहेबांकडे सर्व अधिकार देण्याचा ठराव मांडला. काहीतरी नवीन कांड करून निवडणूक जिंकण्याची भाजपची पद्धत आहे. आपण सर्व जण अतिआत्मविश्वासात न राहता काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू या

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, मोदी लाट आणि जातीपातीचे समीकरणामुळे, पुलवामा हल्ला यामुळे सोलापुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. पण भाजपचा आणि खासदारांच्या बाबतील लोकांचा भ्रमनिरास झाला असून भाजप आमदारांच्या अपयशी कारभार, महानगरपालिकेतील भाजपचा भोंगळ कारभार यामुळे आत्ता जनतेला कळून चुकले आहे.  हे लोक बोलबच्चन आहेत. सांगण्यालायक कोणतेही काम भाजपला करता आले नाही. म्हणुन आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून काँग्रेसचा विजय निश्चित आहे. 

प्रदेश कार्याध्यक्षा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, धनाजी साठे, रामहरि रूपनवर, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाज हुंडेक़री, विनोद भोसले, महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन शेख, प्रदेश चिटणीस  किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, पंडित सातपुते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड़, उदय चाकोते, बाबूराव म्हेत्रे, अरुण साठे, लक्ष्मीकांत साका, रफीक इनामदार, वाहिद बिजापुरे, तिरुपती परकीपंडला, दादा साठे, रूपेश गायकवाड, प्रतीक आबूटे, विश्वराज चाकोते, श्रद्धा हुल्लेनवरु, भीमराव बाळगे, सुधीर लांडे, रमेश हसापुरे, महेश जोकारे, वसीम पठाण, राजन कामत, पशुपती माशाळ, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, मोतीराम चव्हाण, ऋषिकेश बोबड़े, नाना पालकर, अण्णा शिंदे, किशोर पवार, समीर शेख, अदनान शेख, सुभाष वाघमारे, महेंद्र शिंदे, राजकुमार पवार, पीयूष इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमार शिंदे व सुधीर खरटमल एकाच स्टेजवर शेजारी-शेजारी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Next Post

सोलापूर के एमआयएम मे इतना सन्नाटा क्यू है भाई ; मामू, आपने को तो माल मिलता है ना बस

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर के एमआयएम मे इतना सन्नाटा क्यू है भाई ; मामू, आपने को तो माल मिलता है ना बस

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986007
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group