देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष पूर्ण होत आहेत त्या पश्चात भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहर व जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
या बैठकीत सोलापूर सांगली व पुणे लोकसभा क्लस्टर प्रमुख आमदार सुभाष देशमुख, सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला शहर उत्तरचे आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गैरहजेरी होती, मालकांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून गेली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, हे अभियान पार्टीने गंभीरपणे घेतले असून या अभियानासाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांना जिल्हानिहाय व लोकसभा मतदार संघानिहाय जबाबदारी देण्यात आली असून,1400 आमदार 300 खासदार देशभरात या अभियानासाठी काम करणार आहेत. जे लोकप्रतिनिधी हे अभियानाबाबत उदासीनता दाखवतील त्यांचे रेपोर्टिंग प्रदेशाला होणार असल्याचे सांगत त्यांनी काही लोकांना इशारा दिला.
सोलापूर लोकसभा क्लस्टर प्रमुख आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यांची जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे.
खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मागील नऊ वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या महत्त्वपूर्ण अशा योजनांची माहिती दिली. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.




















