सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सीईओ स्वामी यांनी उपदेशाचे चांगलेच इंजेक्शन दिले.
ते म्हणाले, आरोग्य सेवकांचे एकच काम आहे ते म्हणजे चांगल्या आरोग्य सेवा देणे, माञ ते सोडून दुसरेच काम सुरू असते. ही कार्यशाळा घेण्या मागचा उद्देश एकच आहे की संवाद कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास ही प्रशासनाशी निगडित काम आहे. कर्मचारी जर मनाने मजबूत झाले तर आपल्याच विभागाची सेवा चांगली देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहा स्वामी नक्की काय म्हणाले हा व्हिडिओ….


















